पाकिस्तानी संसदेत खासदार बरळलाच, म्हणाला – ‘पॅलेस्टाईन, काश्मीरसाठी अणुबॉम्ब टाका, कशाला ठेवलेत?’

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. तुर्कस्तान सोबत राहून इस्त्रायल विरोधात पाकिस्तान षडयंत्र रचत आहे. मुस्लिम देशांची आघाडी उघडण्याचे स्वप्न बाळगून पॅलेस्टाईनच्या बहाण्याने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री तुर्कीला गेले आहेत. अशावेळी पाकिस्तानच्या संसदेत एका खासदाराने इस्रायल आणि भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे वक्तव्य केले आहे. मौलाना चित्राली अस या खासदाराच नाव आहे. दरम्यान, सोमवारी इस्त्रायल विरोधात एक परिषद बोलावण्यात आली होती. या परिषेदच्या माध्यमातून ५७ मुस्लिम देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. मात्र, इस्त्रालयविरोधात एकत्र येण्याएवजी हे देश आपआपसातच भिडले आहेत.

संसदेत बोलताना मौलाना चित्राली म्हणाले, इम्रान सरकारने पॅलेस्टाईन आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी अणुबॉम्ब, मिसाईलचा वापर करण्यास मागेपुढे पाहता कामा नये. पॅलेस्टाईन आणि काश्मीरला स्वतंत्र करू शकत नसलो तर आम्हाला मिसाईल, अणुबॉम्ब आणि विशाल सैन्याती काहीच गरज नाही. म्युझियममध्ये पाहण्यासाठी अणुबॉम्ब बनविले आहेत का, अशी दर्पोक्ती ही चित्राली यांनी केली.

इस्त्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यामुळे तुर्की आणि पाकिस्तानला एक संधी साधून आली आहे. पॅलेस्टीनींना कोरोना मदत पाठविण्याची घोषणा कंगाल झालेल्या पाकिस्तानने केली आहे. या दोन्ही देशांना या व्दारे आपण मुस्लिम देशांची सहानुभूती मिळवू आणि मुस्लिमांचे नेते बनू. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील तणाव वाढत असून हमासकडून इस्त्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे इस्त्रायल कडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गाझामध्ये हे हल्ले झाले असून इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळाही उद्ध्वस्त झाली आहे. या हल्ल्यांच्या संदर्भात गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन दिले आहे. त्यात असे म्हंटले आहे की, हमासाविरोधात सुरु असलेल्या इस्त्रायली युद्धाचा सामान्य लोकांवर परिणाम होत आहे. आतापर्यंत या हल्ल्यांत २१३ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६१ मुलांचा समावेश आहे. तसेच दीड हजाराहून अधिक जखमी झाले आहेत.