आयटी अभियंत्याची फसवणूक करणाऱ्यास दिल्ली येथून अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

‘ऍक्सेंचर’ कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने इन्फोसिस मधील आय टी अभियंत्याची फसवणूक करणाऱ्यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा सायबर सेल कडून दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे.

आय टी सपोर्ट म्हणून काम करणाऱ्या अभियंत्यास ऍक्सेंचर कंपनीत चांगल्या पगाराची आणि पदाची नोकरी  देण्याच्या बहाण्याने त्याची लाखोंची फसवणूक केली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c4d5138-9672-11e8-8ad0-a5c23af6ead9′]

क्रांतीकुमार सालीक्रान्ति  तेलंगणा येथील अभियंता एक महीन्यापासून हिंजेवाडी येथील इन्फोसिस कंपनीत आय टी सपोर्ट म्हणून काम करत असताना त्याने अधिक  पगार व चांगल्या पदाची नोकरी मिळविण्याकरिता shine.com च्या संकेतस्थळावर स्वतःचा बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर त्यास वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून आरोपी याने shine.com  असल्याचे भासवून त्याचेकडून रेजिस्ट्रेशन फि, डॉकुमेंट वेरिफिकेशन, टेलिफोनिक इंटरव्हू फी या नावाखाली पेटीएमद्वारे पैसे भरून घेतले. त्यानंतर त्याचा टेलिफोनिक इंटरव्हू घेऊन त्याची मगरपट्टा येथील ऍक्सेंचर कंपनीत निवड झाल्याचे सांगून जॉईन करण्यापूर्वी सिक्युरिटी डिपॉसिट भरावे लागेल असे सांगून त्याच्याकडून दोन लाख ११ हजार ७६८ रुपयांची फसवणूक केली .

याबाबत फिर्यादीने सायबर सेल पुणे येथे अर्ज केला होता. त्यावरून हिंजवडी पोलीस स्टेशन येथे भा. द. विं. कलम ४१९,४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी ) ६६ (डी ) प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला. सदर अर्जावर तांत्रिक तपस करून सायबर शाखेच्या पोलीस निरीक्षक राधिका फडके, एस.डी. बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खामगळ, कर्मचारी जबा, पोतदार, जाधव, वाव्हळ, वानखेडे आणि त्यांच्या पथकाने मोहम्मद सलमान (रा . गाझियाबाद) यास अटक केली  आहे. त्याच्याकडून १३ मोबाइल, १५ चेकबुक, १८ डेबिटकार्ड , ०४ बँक पासबुक, २ राउटर, ०१ हार्ड डिस्क , ०७ सिम कार्ड, आणि ११५०० रु जप्त करण्यात आले आहेत. तपास पोलीस करत आहेत.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82e84c17-9672-11e8-af74-6f74082db3ac’]