आयटी अभियंता तरूणीला स्वतःचा नग्न व्हिडीओ पाठवण्यासाठी धमकी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पीडित आयटी अभियंता तरुणी कामावर असताना एकाने तिला फोन करुन, फोटोत छेडछाड करुन तिचा अश्लील फोटो तिला पाठवला, तसेच हा फोटो इतर वेगवेगळ्या व्हाट्सअ‍ॅप्प ग्रुप मध्ये पाठवायचा नसेल तर एक मिनिटांचा तुझा नग्न व्हिडीओ पाठव अशी धमकी दिली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

निगडी परिसरात राहणाऱ्या पीडित २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तर एका अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पीडित तरुणी कंपनीत असताना घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणीला एकाने तिच्या मोबाईलवर तिच्या फोटोमध्ये छेडछाड करून त्या फोटोचा अश्लील फोटो तयार करून पाठवला. तसेच हा फोटो वेगवेगळ्या ग्रुप मध्ये व तुझ्या मित्रांना पाठवतो अशी धमकी दिली.

फोटो कोणाला पाठवायचा नसेल तर तुझा एक मिनिटांचा नग्न व्हिडीओ मला पाठवून दे तो मी कोणाला दाखवणार नाही. तसेच तू पोलिसात तक्रार दिल्यास बघ तुला काय करतो असे म्हणून धमकी दिली. व्हाट्सअ‍ॅप्प कॉल करून पीडितेला त्रास दिला. तपास निगडी पोलीस करत आहेत.