जळगाव : ओळखीच्या महिलेनेच तरुणीला तरूणासोबत नको ‘ते’ करायला लावलं, जाणून घ्या प्रकरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका ओळखीच्या महिलेनेच 18 वर्षांच्या तरुणीला एका तरुणासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तूला ठार मारेन अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यात बुधवारी (दि. 7) ही घटना घडली आहे. या प्रकरणी पिडितेने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या महिलेसह एका तरुणाला अटक केली आहे.

विवेक महेंद्र मराठे (20,रा.हरिविठ्ठल नगर) आणि तसेच आरती सचिन महाजन (रा. शहापूर जि. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याना न्यायालयात हजर केले असता मराठे याला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात 18 वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती या महिलेशी ओळख होती. 7 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास तरूणी एकटी घरी होती. त्यावेळी आरोपी महिलेने तू विवेक मराठे याला आवडतेस, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुमचे शारीरिक संबंध आहेत, असे तुझ्या आई-व़डिलाना खोटे सांगेन असे म्हणत धमकी दिली. आरती हिने विवेक मराठेशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.