केवळ 5499 रूपयांमध्ये भारतात लॉन्च झाला Itel Vision 1 स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयटेल कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या Itel Vision 1 स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टाकोर प्रोसेसर असणाऱ्या या फोनमधील रियर कॅमेऱ्याची डिझाईन आयफोन ११ सारखी देण्यात आली आहे. तसेच अँड्रॉयड पाय ९.० यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

६ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेल्या या Itel Vision 1 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टदेखील आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०X१५६० पिक्सल आहे. फोनमध्ये युनिसॉकचे ऑपरेटर प्रोसेसर आहे. तसेच २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये या फोन देण्यात आला असून मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने हा स्टोरेज १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. आयफोन ११ सारख्या दिल्या जाणाऱ्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्यातील एक ८ मेगापिक्सलचा तर दुसरा लेन्स ०.०८ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आहे. सोबतच ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

४००० एमएएच क्षमतेची बॅटरी असणाऱ्या फोनमध्ये मागच्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे, या सोबतच फेस अनलॉक पर्याय देखील उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या ५ हजार ४९९ रुपयांत हा फोन मिळणार असून या सोबत ७९९ रुपयांचा ब्लूटूथ हेडफोन फ्री मिळणार आहे. एवढेच नव्हे तर फोनसोबत जिओकडून २२०० रुपयांचा कॅशबॅक आणि २५ जीबी अतिरिक्त डेटा देण्यात येणार आहे. हा फोन ग्रेडिएशन ब्लू आणि ग्रेडिएशन पर्पल या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला असून रिटेल स्टोअरमधून याची विक्री सुरू करण्यात आली आहे.