‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संकटामुळे गेल्या मार्चपासून देशभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. असे असतानाच एका खासगी शाळेच्या संचालकाने फी वसूलीसाठी पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.

उत्तर प्रदेशच्या जबलपूर शहरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने शाळेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अखिलेश मेबन असे गुन्हा दाखल झालेल्या शाळेच्या संचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर शहरातील प्रसिद्ध शाळा जॉय सीनियर सेकंडरी स्कुलमध्ये हा प्रकार घडला आहे.

अखिलेश मेबन याने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला एका बंद खोलीत बोलावून त्यांना गार्डद्वारे गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पालकांना शिवीगाळ देखील केल्य़ाची माहिती मिळत आहे. आरोपी संचालकाविरूद्ध धमकी देण्यासोबत अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.