Jacqueline Fernandes | मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिसची 25 सप्टेंबरला होणार पुन्हा चौकशी, नोरा फतेहीला सुद्धा ईडीने बोलावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Jacqueline Fernandes | अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग (money laundering) च्या प्रकरणात बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Bollywood actress Jacqueline Fernandes) चा जबाब (statement) काही दिवसांपूर्वी नोंदवला होता. 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तची फसवणूक आणि खंडणी (fraud and extortion) चा आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) च्या संबंधीत केसमध्ये दिल्लीत चार तासापर्यंत जॅकलीन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर प्रिव्हेंन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) अंतर्गत साक्षीदार (witness) म्हणून तिचा जबाब नोंदला गेला होता. आता पुन्हा एकदा जॅकलीनची चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला पुन्हा समन्स (summoned) पाठवण्यात आले आहे.
तिला 25 सप्टेंबरला ईडीच्या समोर हजर होण्यास सांगितले आहे.

नोराची सुद्धा होणार चौकशी

ईडीने नोरा फतेही (Nora Fatehi) ला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.
आता नोराचे नाव सुद्धा या प्रकरणात समोर आले आहे.

सुकेश चंद्रशेखरला पोलिसांनी या वर्षीच अटक केली आहे. सुकेशवर आरोप आहे की, त्याने जेलच्या आत बसून 200 कोटी रुपयांच्या वसूलीचे मोठे रॅकेट चालवले.
सुकेशने जेलमधून एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या पत्नीकडून 50 कोटींची खंडणी मागीतली.
पोलिसांनी जेव्हा या केसच्या तपासात जेलमध्ये छापा मारला तेव्हा त्याच्या सेलमधून दोन मोबाइल फोन सुद्धा जप्त केले होते.

 

सुकेशविरूद्ध सुरू असलेल्या या केसमध्ये जॅकलीनला मुख्य साक्षीदार म्हणून ठेवण्यात आले आहे.
ज्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाची ही केस आणखी मजबूत झाल्याचा दावा केला जात आहे.
सुकेश चंद्रशेखरवर यापूर्वी देखील असे अनेक मनी लाँड्रिंगचे आरोप झाले आहेत.
यापूर्वी लीना (Leena Maria Paul) सोबत मिळून मिळून सुकेशने 2013 ने कॅनरा बँकेसोबत फ्रॉड केला होता.
ज्यानंतर या जोडीला मुंबई पोलिसांनी (Mumbai police) 2015 मध्ये फ्रॉडच्या प्रकरणात अटक केली होती.

 

Web Title :  Jacqueline Fernandes | money laundering case jacqueline fernandez to be questioned again on september 25 nora fatehi also called by ed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Jewellery Retailers Revenue | सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांचा ‘महसूल’ 12-14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता – Crisil

Pune Court | बालेवाडी येथील जागा हडपण्यासाठी बनावट खरेदीखत तयार करून सेवानिवृत्त अधिकार्‍याची फसवणूक; उत्तुंग पाटीलला अटक

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार