‘भाईजान’ सलमानच्या प्रकृतीची जॅकलीनला ‘चिंता’, दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान खूप बिजी शेड्युल असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा कालावधी वाढल्यानं सलमानला अजिबातच वेळ नाही. याशिवाय तो अनेक अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावत असतो. अलीकडेच तो आयफा अवॉर्डशी संबंधित प्रेस कॉन्फरन्समध्ये जॅकलीन फर्नांडिससोबत दिसला होता. समलान म्हणाला होता की हा शो तो होस्ट करणार आहे.

जॅकलीननं सांगितलं सलमानचं सिक्रेट
सलमानबद्दल बोलताना जॅकलीन म्हणाली, “मी त्याच्या सोबत काम केलं आहे. त्याचं काम खूप जवळून पाहिलं आहे. मला माहिती आहे त्याला झोपण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. सकाळ संध्याकाळ तो कामात व्यस्त असतो. एक तर तो फ्लाईटमध्ये असतो किंवा बिग बॉसच्या सेटवर शुटींगसाठी जात असतो, किंवा मग एखादं गाणं शुट करत असतो. तो नेहमीच कामात असतो. सलमाननं आराम करण्यासाठी वेळ काढायला हवा.” असा सल्ला जॅकनं सलमानला दिला.

सलमान या सेरेमनीत होस्ट करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अवॉर्ड नाईटमध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि कॅटरीना कैफसारखे स्टार्स परफॉर्म करताना दिसणार आहेत. या इव्हेंटमध्ये इंडस्ट्रीतील 5 हजाराहून अधिक लोक असणार आहेत. यात 400 हून अधिक फिल्म आर्टीस्ट असतील.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं ‘अटॅक’ या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमात ती जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह या कलाकारांसोबत काम करताना दिसणार आहे. खऱ्या घटनेपासून प्रेरीत असा हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.