‘या’ राज्य सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला 15 दिवसांत निकाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिलेवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर विविध राज्याकडून महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्पष्ट संकेत दिले. जगनमोहन रेड्डी सरकारने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निष्काळीपणा चालणार नाही. यासाठी नवा कायदा अंमलात आणण्याची तयारी करत आहे. त्यानुसार आता महिलांसंबंधित काही बलात्काराच्या घटना घडल्या तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल.

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची रेड्डी यांनी प्रशंसा केली. यानंतर बोलताना आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान बोलताना रेड्डी म्हणाले की मी दोन मुलींचा बाप आहे, मला एक बहीण आहे, एक पत्नी आहे. माझ्या मुलीबरोबर असा काही प्रसंग झाला असता तर माझी प्रतिक्रिया काय असती? मी कोणाकडे न्याय मागितला असता ?

महिलांवरील अत्याचारांवर जगनमोहन सरकार गंभीर आहेत. महिलांवरील बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात येत आहे. भारतीय दंड संहिता यातील कलम 354 मध्ये सुधारणा करुन त्यात कलम 354 ई लागू करण्यात येईल. यानुसार महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल.

विशेष म्हणजे काहीच आठवड्यात या अशा खटल्यावर फास्ट्रॅक न्यायालयात सुनावणी करण्यात येईल. 15 दिवसात खटला निकाली निघेल अशी तरतूद कायद्यात आहे. एवढेच नाही तर दोषींना 3 आठवड्यात शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. हा कायदा लागू करण्याची तयारी जगनमोहन रेड्डी सरकारकडून सुरु झाली आहे. कारण सरकारचे राज्यातील महिला आणि बालकांची सुरक्षा हे प्राधान्य असणार आहे.

हैदराबाद प्रकरणानंतर देशातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हैदराबाद प्रकरणातील पीडितेच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे धक्कादायक खुलासे समोर आले. 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. 4 जणांनी पीडितेवर अत्याचार केले. ट्रक ड्रायव्हरसह त्यांच्या क्लिनर्सनकडून पीडितेवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी चौघांना देखील ताब्यात घेतले. त्यानंतर एन्काऊंटरमध्ये चौघांचा खात्मा झाला.

Visit : policenama.com