RJ : एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी केली आत्महत्या, कर्ज माफियांमुळे होते ‘त्रस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानची राजधानी जयपूर येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केली आहे. आई-वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. ही घटना कानोटा पोलीस स्टेशन परिसरातील जमडोलीची आहे. हे कुटुंब कर्जामुळे त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे प्रकरण प्रामुख्याने आत्महत्येशी संबंधित असल्याचे मानले जाते.

पोलिसांनी सांगितले की, आई-वडिल आणि दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केली आहेत. या कुटुंबातील सदस्यांनी फास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमलाही चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. हे कुटुंब ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित होते. हे कुटुंब कर्जातून त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलरीचे काम करणाऱ्या या कुटुंबावर कर्जाचा बोजा होता. हे कुटुंब कर्जामुळे अस्वस्थ होते कारण व्याज माफिया कुटुंबाला त्रास देत होते. या क्षणी पोलिसांनी व्याज माफियाला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या व्याज माफियांची चौकशी केली जात आहे.