‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील आपल्या तळावर हल्ला केल्याची कबुली जैश-ए-मोहम्मदने दिल्याने आता पाकिस्तानची पंचायत झाली आहे. दुसरीकडे जैशचा म्होरक्या मसूद अझहर हा जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत पाकिस्तानच्या मिडियाने यु टर्न घेतला आहे.

मसूद अझहर याचा भाऊ मौलाना आत्तार याचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्यात भारतीय हवाई दलाने आपल्या बालाकोट येथील कॅम्पवर हल्ला केल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच पंचायत झाली आहे. याअगोदर पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. पण, त्यांना पाकिस्तानच्या विमानांनी पळवून लावले. त्यावेळी त्यांनी जाताना वाटेत काही बॉम्ब टाकले. ते निर्जन जागेवर पडले असून काहीही नुकसान झाले नसल्याचे जाहीर केले होते. जैशच्या या खुलाशाने पाकिस्तानला आता त्याला काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा – मनधरणीसाठी दानवेंची खोतकरांच्या घरी पायधुळ 

भारतीय हवाईदलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र, रविवारी मसूदही ठार झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वाऱ्यासारखे पसरले होते. याला पाकिस्तानी माध्यमांनीही दुजोरा दिला होता. मात्र, जैश आणि पाकिस्तानी सरकार यांच्याकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आता पाकिस्तानी माध्यमांनीही  युटर्न घेतला असून मसूदच्या जवळच्या नातेवाईंकांचा हवाला देत तो जिवंत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मसूद अझहरच्या मृत्यूच्या वृत्तामुळे भारतीय गुप्तचर विभागही सक्रिय झाला असून या वृत्ताची सत्यता पडताळण्यात येत आहे. मसूद हा पाकिस्तानी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही मसूद आजारी असल्याचे म्हटले होते, मात्र, कुठे आहे हे माहित नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबुली पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. पण, त्यांचे असे म्हणणे आहे की, भारताने ठोस पुरावे दिल्यासच सरकार त्याच्याविरुद्ध काही पावले उचलू शकते. दरम्यान, मसूद अजहर सध्या एवढा आजारी आहे की, घराच्या बाहेरही निघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.