जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपिलात मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक सहकार अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.9) दुपारी करण्यात आली. शशिकांत नारायण साळवे Shashikant Narayan Salve (वय 54, रा. मंगलमूर्तीनगर, पिंप्राळा, साईबाबा मंदिराजवळ, जळगाव) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. जळगाव एसीबीच्या पथकाने (Jalgaon ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 44 वर्षीय व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी 2013 मध्ये यावल तालुक्यातील दुसखेडा येथील जमीन खरेदी खत करून विकत घेतली आहे. त्यानंतर 2014 मध्ये या शेतजमिनीचे मूळ मालक नीलेश पाटील यांनी शेतजमीन परत मिळण्यासाठी भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा (Civil Claim) तक्रारदार यांच्यासह पूर्वीचे खरेदीदार यांचे विरुद्ध दाखल केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
नीलेश पाटील यांनी 2018 मध्ये पुन्हा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव या कार्यालयात शेतजमीन परत मिळण्यासाठीचा दावा दाखल केला. या दाव्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी तक्रारदार हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयात हजर राहून दाव्याचे कामकाज पाहणारे सहायक सहकार अधिकारी शशिकांत साळवे यांचे समोर हजर राहिलेले आहेत.
यानंतर या दाव्याचा निकाल लागला. तक्रारदार यांनी शशिकांत साळवे यांच्या कार्यालयात जाऊन भेटून या निकालाची प्रत प्राप्त करून घेतली. या निकालाच्या अंतिम आदेशात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम (Maharashtra Moneylending Act) सन 2014 चे कलम अन्वये आदेश, असे नमूद असून त्याची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव (Superintendent of Police Jalgaon) यांना देण्यात आली. तक्रारदार यांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांचे स्वतः वर सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा (FIR) दाखल होऊ शकतो तसेच खरेदी केलेली शेतजमीन परत करण्याचे आदेश दिले होते म्हणून तक्रारदार यांनी त्याविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला. अपिलासाठी लागणारे निकालाच्या सत्यप्रती घेण्यासाठी तक्रारदार यांनी लेखी अर्ज शशिकांत साळवे यांचेकडे केला होता.
तक्रारदार या दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती घेण्यासाठी शशिकांत साळवे यांना भेटले असता,
साळवे यांनी तक्रारदार यांना सावकारी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तसेच नाशिक येथे जे अपील करणार आहेत,
त्या अपिलात योग्य ती मदत करण्यासाठी व दाव्याच्या निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे याबाबत तक्रार केली. पडताळणी केली असता साळवे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शुक्रवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये लाच घेताना शशिकांत साळवे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmishtha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक एन.एस. न्याहळदे (Addl SP NS Nyahalde),
वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी जळगाव पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस. पाटील (DySP Shashikant S. Patil),
पोलीस निरीक्षक एस. के. बच्छाव (Police Inspector S.K. Bachhao),
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील (PSI Dinesh Singh Patil), पोलीस अंमलदार बाळू मराठे, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.
Web Title :- Jalgaon ACB Trap | 10,000 bribe, assistant cooperative officer in anti-corruption trap
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार
SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम