Jalgaon Crime | दुर्देवी ! रक्षाबंधनाला घेण्यासाठी आलेल्या भावाला दिसला बहिणीचा मृतदेह

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन Jalgaon Crime | रक्षाबंधनचा सण जवळ आला आहे. अशातच सासरी असलेल्या आपल्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी गेलेल्या एका भावाला बहिणीचा मृतदेहच (Dead Body) गळफास घेतल्याच्या स्थितीत दिसल्याची हृदयद्रावक घटना जळगावात घडली आहे. मृत विवाहिता आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणामुळे सतत वाद होत होते. मृत विवाहितेचे नाव प्रिया विनोद सुरवाडे (Priya Vinod Surwade) असे आहे. (Jalgaon Crime)

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोपाळ, मध्य प्रदेशातील प्रिया देव, वय 26 हिचा विवाह दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी जळगावातील पाचोरा, गणपतीनगर येथील विनोद सुरवाडे (Vinod Surwade) यांच्याशी झाला होता. विनोद हे एमएसएफ (MSF) सेवेत कार्यरत आहेत. दरम्यान, या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले होते. (Jalgaon Crime)

 

याची कल्पना प्रियाने आपल्या माहेरच्यांना दिली होती. रविवारी 7 आगॅस्टला विनोद व प्रिया यांच्यात सकाळपासूनच भांडण सुरू झाले होते. प्रियाने ही माहिती तिची बहिण दीपाली हिला मोबाईलवरून दिली. यानंतर दीपालीने आपला भाऊ देवेन देव याला ही माहिती कळवली.

येत्या दोन दिवसात रक्षाबंधन असल्याने भाऊ देवेन देव (Deven Dev) यांनी प्रियाला घरी घेऊन येऊ व तिच्या पतीसह सासरच्यांची समजूत काढू, असा विचार केला. देवेन देव आपले मेहुणे शशांक शेजवाल यांना घेऊन रविवारी रात्री पाचोरा येथे प्रियाच्या घरी जाण्यासाठी निघाले. आम्ही येत आहोत, असे त्यांनी प्रियालाही कळवले होते. देवेन व शशांक हे दोघे आज 8 ऑगस्ट रोजी पहाटे पाचोरा येथे पोहोचले.

 

दरम्यान, सकाळी विनोदची मामी प्रियाला उठवण्यासाठी गेली असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
याचवेळी प्रियाचे भाऊ व मेहुणे तिच्या घरी पोहोचले. बहिणीला या आवस्थेत पाहून भाऊ देवेन यांनी हंबरडा फोडला.
माझी बहीण आत्महत्या (Suicide) करूच शकत नाही, तिची हत्या (Murder) झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच कारवाईची मागणी केली.

 

Web Title :- Jalgaon Crime | sister dead body saw by brother he come for rakshabandhan jalgaon pachora crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

 

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता