Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद (Legislative Assembly Opposition Leader) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) देण्यात आले आहे. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेसह (Shivsena) काँग्रेसने (Congress) देखील दावा केला आहे. विधान परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. मात्र शिवसेनेच्या या दाव्यानंतर आज अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी बोलताना वेगळीच भूमिका मांडली आहे. या सर्वामध्ये सरकारची भूमिका जाणून घेतल्यावर पुढील निर्णय होईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.

 

विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. आता विधान परिषदेत सभापती (Legislative Council Speaker), विरोधी पक्षनेतेपद रिक्त असून येथील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. यासाठी शिवसेनेचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची चर्चा आहे. विधान परिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे 10 सदस्य आहेत. तर शिवसेनेचे 12 सदस्य आहेत. उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) आहेत. यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची मागणी काँग्रेसने केली आहे.

 

याबाबत अजित पवार यांनी म्हटले की, विधान परिषदेत सभापती पद रिक्त तर उपसभापतीपद भरलेले आहे. राज्य सरकारचे (State Government) मत यात महत्त्वाचे आहे. विधान परिषदेच्या कामकाजाबाबत उद्या बैठक आहे. सरकारची भूमिका काय आहे हे विचारल्यावर पुढील निर्णय होईल.

शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion) पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या सुरू आहेत.
परंतु तसे असेल तर मुख्य सचिवांकडून विरोधकांना निमंत्रण येते. अद्याप असे पत्र नाही.
कदाचित रात्री उशिरा येऊ शकते. दिल्लीवारीनंतर नंदनवनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.
मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी दाट शक्यता वाटते. परंतु अधिकृत निमंत्रण नाही.

 

अजित पवार म्हणाले, उद्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची (Legislative Affairs Advisory Committee) बैठक आहे.
त्याबाबत आम्हाला कळवण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून कळवले नाही. मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला आहे.
लवकर करू असे आश्वासन दिले जात होते. सरकारमधील वेगवेगळ्या सहकार्‍यांना मुंबईला बोलावले आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते.

 

Web Title : – Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा