Jalgaon Crime | धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ‘सैराट’ ची पुनरावृत्ती अल्पवयीन भावाने बहीण व तरुणाचा केला खून

चोपडा : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शुक्रवारी रात्री सैराट सारखी घटना समोर आली आहे. प्रेमी युगुलापैकी (Lover) तरुणाचा गोळ्या घालून (Firing) तर आपल्याच बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून (Murder) केला. अल्पवयीन मुलाने मित्रांच्या मदतीने दोघांचा (Jalgaon Crime) खून केला.

 

राकेश संजय राजपूत Rakesh Sanjay Rajput (वय 22, रा. रामपुरा, चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी Varsha Samadhan Koli (वय 20, रा. सुंदरमढी, चोपडा) असे खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. खून केल्यानंतर तरुणीचा भाऊ स्वत: च पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश हा वर्षा हिला पळवून नेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी रात्री तिच्या घरी आला होता.
त्याला चौघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर शहरानजीक नाल्याजवळ नेले.
तेथे त्याच्या कपाळात गावठी कट्ट्याने गोळ्या घालून खून केला. त्यानंतर बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला.

 

या घटनेनंतर हा अल्पवयीन मुलगा पोलीस ठाण्यात आला व त्याने सर्व हकीकत सांगितली.
तुषार कोळी (रा. माचला, ता. चोपडा), भरत संजय रायसिंग (रा. चोपडा), निलेश कोळी अशी इतर आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांना अटक (Arrest) केली आहे.

 

Web Title : –  Jalgaon Crime | the murder of the lovers the youths brother shot the young man the sisters throat was slit in chopda jalgaon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा