Jalgaon Crime | धक्कादायक ! मुलांसोबत मिळून पत्नीने पतीची केली निर्घृण हत्या; शहरात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे पत्नीनेच आपल्या पतीला संपवल्याची धक्कादायक घटना (Jalgaon Crime) दुपारी उघडकीस आली आहे. आपल्या दोन मुलांसोबत मिळून पत्नीने पतीची हत्या (Murder) केली असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संजय खेडकर (Sanjay Khedkar) हे आपली 2 मुले आणि पत्नीसोबत भास्करनगर (Bhaskar Nagar) येथे राहत होते.
त्यांना प्रतीक (Pratik) व रोहित (Rohit) ही 2 मुले आहेत.
संजय खेडकर काहीही कामधंदा करीत नव्हते. ते सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. या कारणावरून घरात नेहमीच वाद होत होता. दोन्ही मुलांनाही ते अनेक गोष्टी वरून बोलत असत. अपमानास्पद वागणूक देत असत. त्यामुळे वडिलांबाबत दोन्ही मुले आणि त्यांच्या आईच्या मनात राग वाढला होता. दरम्यान, सकाळी पुन्हा वाद उकरून काढण्यात आला. त्या वादात संगनमताने संजय खेडकर यांच्या डोक्यावर आणि शरीरावर हत्याराने वार करण्यात आले आहे. या हल्ल्यात पती संजय खेडकर यांचा मृत्यू (Died) झाला आहे. (Jalgaon Crime)

 

दरम्यान, याबाबत माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा पोलिसांत (Pachora Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पाचोरा पोलिसांनी या मृत वडिलांच्या दोघा मुलांसह पत्नीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :-Jalgaon Crime | woman killed husband with help of two children in jalgaon over daily abusive behavior and argument

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा