Jalna ACB Trap | 10 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर एसीबीकडून FIR

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीनासाठी (Bail) मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demand a Bribe) पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalna ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. भागवत पांडुरंग वाघ (Bhagwat Pandurang Wagh) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जालना एसीबीने (Jalna ACB Trap) मंगळवारी (दि.7) पडताळणी करुन शुक्रवारी (दि.10) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 28 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे तक्रार केली आहे. भागवत वाघ हे बदनापूर पोलीस ठाण्यात (Badnapur Police Station) पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या भावावर पोलीस ठाणे बदनापूर येथे विविध कलमाखाली गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्हयात तक्रारदार यांच्या भावाला जामीन होण्यास मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक भागवत वाघ यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे तक्रार केली. जलना युनिटने पडताळणी केली असता भागवत वाघ यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. लाच मागितल्याप्रकरणी वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर (DySP Sudam Pachorkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. शेख (Police Inspector S.S. Sheikh) पोलीस अंमलदार गणेश चेके, कृष्णा देठे, जावेद शेख, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव जुंबड, ज्ञानेश्वर मस्के यांच्या पथकाने केली.

Web Title :- Jalna ACB Trap | FIR by ACB against police sub-inspector who demanded Rs 10 thousand bribe