Jalna ACB Trap News | जालना अॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – गुन्हयाचा तपास स्ट्राँग करण्यासाठी लाच मागणार्या पोलिसाविरूध्द गुन्हा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Jalna ACB Trap News | अपघाताच्या गुन्हयाचा तपास स्ट्राँग करण्यासाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनमधील (Sadar Bazar Police Station) पोलिस अंमलदाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau Maharashtra) गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Jalna Bribe Demand Case). अच्युतराव गोब्रा पवार Achyutrao Gobra Pawar (57, रा. योगेशनगर, जालना) असे लाचेची मागणी करणार्या पोलिसाचे नाव आहे. (Jalna ACB Trap News)
याबाबत अधिक माहिती अशी की, अच्युतराव ग्रोबा पवार हे जालना पोलिस (Jalna Police) दलातील सदर पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यास नेमणुकीस आहेत. तक्रारदाराच्या नातवाच्या अपघाताचा गुन्हा सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे (Jalna Crime News). सदरील गुन्हयाचा तपास पोलिस अंमलदार अच्युतराव गोब्रा पवार यांच्याकडे होता. दाखल गुन्हयाचा स्ट्राँग तपास करण्यासाठी त्यांनी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Jalna ACB Trap News)
तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे त्याची तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता अच्युतराव पवार यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
त्यामुळे पवार यांच्याविरूध्द सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर (DySP Sudam Pachorkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर (Shankar Mutekar), पोलिस हवालदार गजानन घायवट,
पोलिस नाईक गजानन कांबळे, पोलिस नाईक चालक प्रविण खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title :- Jalna ACB Trap News | Jalna Anti-Corruption Bureau: Anti-Corruption Branch – Case against police for demanding bribe to strengthen crime investigation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा