Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमध्ये राजकीय वातावरण (Maharashtra Political News) तापले आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्याकडून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Legislative Council Opposition Leader) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्ही त्याला जसास तसं प्रत्युत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. जळगावात माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

 

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, पाचोऱ्यात सभा होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानांचा कोणताही परिणाम आजच्या सभेवर होणार नाही. याउलट अशी आव्हान दिली तर शिवसैनिक (Shiv Sainik) त्वेषाने या सभेला येतील. त्यांची आव्हानं परतून लावणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

 

सभेत कुणी आडवं आलं तर…
दानवे पुढे म्हणाले, आज राज्यात निवडणुका (Elections) नाहीत, केवळ विचार व्यक्त करण्यासाठी या सभेचं आयोजन केलं आहे. शिवसेनेने आतापर्यंत कोणाच्याही सभेला अडवलेलं नाही. पण आता उद्धव ठाकरे यांच्या सभेत कुणी आडवं आलं, तर आम्हीही शांत बसणार नाही. यापुढे भविष्य त्यांच्याही सभा होणार आहे. तेव्हा शिवसैनिक काय करतील, याचा विचार त्यांनी करावा, असा इशारा दावने यांनी शिंदे गटाला दिला आहे.

 

त्यांनी दगड मारण्याची भाषा करु नये
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दगडफेक करण्याचे विधान केलं होतं.
यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, गुलाबराव पाटीलांचे हात आता दगड मारणारे नाही,
तर खोके देणाऱ्या गद्दारांचे हात झाले आहेत. ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत,
त्यांनी आता दगड मारण्याची भाषा करु नये, असे दावने यांनी म्हटले.

 

Web Title :- Ambadas Danve | ambadas danve warning gulabrao patil and shinde group over statement regarding uddhav thackeray jalgaon sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कोणी काहीही बोलत असेल तर…’

Amruta Fadnavis On Ajit Pawar | राजकारणी खूप ठिकाणी डोळे मारतात, अमृता फडणवीस यांचा अजित पवारांना टोला

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण