Jalna Lathi Charge Case | मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंचा आरोप; व्हिडीओ ट्विट करत म्हणाले- ‘हे कोण आहेत जे दगड मारत आहेत??’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation Protest) म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून गोळीबार (Firing) करुन लाठीचार्ज (Jalna Lathi Charge Case) केला. जालना जिल्ह्यात घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेवरुन राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजप आणि राज्य सरकारवर (State Government) हल्लाबोल केला आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर निशाणा साधला. तसेच एक व्हिडीओ ट्विट करुन ‘हे कोण आहेत जे दगड मारत आहेत??’ असा सवाल केला आहे. (Jalna Lathi Charge Case)

नितेश राणे म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज चे समर्थन केले जाणार नाही. कोणी अधिकाऱ्याने मस्ती केली असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. त्याला सोडणार नाही. (Jalna Lathi Charge Case) जालना येतील शिबवा संघटनेचे पाटील हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जेव्हा चुकीच्या पद्धीतीने केसेस दाखल केल्या होत्या तेव्हा माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) यांनी सहकार्य करुन वाचवले होते.

पाटील यांचे शांतेत आंदोलन सुरु होते. प्रशासन आणि अधिकारी त्यांच्यात चर्चा सुरु होती. परंतु तेव्हा दगड कोणी मारले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे खास कर्यकर्ते रघुनाथ शिंदे (Raghunath Shinde) यांचा सहभाग, दगडफेक आणि एसटी बस जाळपोळ प्रकरणी दिसून आला आहे. याचा अर्थ दंगल (Riot) घडणार अशी आधी भाकिते करायची आणि नंतर त्यांच्याच लोकांनी जाळपोळ करायची. हा एक प्रकारचा नियोजित कट आहे. मराठा बांधवांनी या चुकीच्या लोकांच्या आवाहनाला बळी पडू नये, कायदा हातात घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. कुणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

दगड मारणारे कोण?

मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात घुसून दगडफेक केली गेल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल आहे.
ते म्हणाले, मराठा समाजाचे आजवर 58 मोर्चे शांतपणे निघाले आहेत. कोणाला त्रास दिला नाही.
मग पोलिसांवर दगड मराठा समाज बांधव मारणार नाही. मात्र ते दगड मारणारे कोण होते हे शोधले जाईल,
असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे योग्य ती माहिती समोर याईल, असेही नतेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

मराठा समाजाला ठाकरे सेनेने बदनाम केलं

मराठा समाजाला आता आणि तेव्हा देखील ठाकरे सेनेने बदनाम केलं. मराठा आरक्षणावर बाजू कोर्टात मांडली नाही आणि या केसची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
आणि आताच्या विरोधकांनी केले होते. अशा लोकांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये.
संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्याचे नेते काय म्हणून टीका करतात.
राऊत ने मुका मोर्चाचे कार्टून पेपरमध्य छापून मराठा आरक्षणाच्या मोर्चाची बदनामी केली.
तर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे मंत्री असताना मराठा आणि इतर समाज यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न केला.
दंगली पेटवल्या कोणी, कोणाला हव्या आहेत. दंगल दंगल असं कोण बोलत होतं.
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या जाळल्या तो शिंहे हा दानवे यांचा कार्यकर्ता आहे, असा आरोपी राणे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या