‘त्या’ तबलिगी जमातीविरोधात मोदी सरकारचा मोठा निर्णय, उचलले कठोर पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट उद्भवणाऱ्या 400 विदेशी जामातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कनिष्ठ न्यायालयांकडून त्यांना एक दिवसांची शिक्षा करण्याव्यतिरिक्त पाच ते दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दिल्लीत एकूण 950 विदेशी जमातींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित 1550 जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी कारवाई केली जात आहे.

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजमध्ये 13 ते 15 मार्चला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मरकज प्रमुख मौलाना साद यांनी अनेक देशांतील लोकांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी 15 हजाराहून अधिक विदेशी नागरिक जमातीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. यानंतर मोठ्या संख्येने विदेशी आपल्या देशात परतले. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळपास 2500 विदेशी भारतात अडकले होते.

आता ज्या जमातींविरोधात कारवाई केली जात आहे, त्यांच्या विषयीची माहिती त्यांच्या देशातील दूतावासांना दिली जात आहे. जेणेकरून आरोपी, दूतावासाच्या सहाय्याने FRRO मधून ते व्हिसा मिळवू शकतील आणि आपल्या देशात परत जातील. पोलीस या जमातींविरोधात जारी केलेले लुक आऊट नोटीसही मागे घेत आहेत. गृहमंत्रालयाने सर्व विदेशी जमातींना भारतात येण्यास 10 वर्षांची बंदी घातली आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, बरेच वर्षे हे जमाती पर्यटक व्हिसावर भारतात येत असत आणि देशभरात अवैधपणे या धर्माचा प्रचार करत होते.

दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या विविध भागात लपून बसलेल्या 950 विदेशी जमातींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तसेच देशातील इतर 16 राज्यात 1550 विदेशी जमाती ताब्यात घेण्यात आले. 17 राज्यातील 2500 जमातींविरोधात राज्यांतील पोलिसांनी 14 बी विदेशी कायदा, तीन महामारी कायदे, 51 आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी आदेशाचे पालन न करणे, कोरोना संसर्ग असूनही दुर्लक्ष करण्याच्या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.