गोपाळनं जामिया परिसरात फायरिंग करण्यापुर्वी लिहिलं – ‘शाहीन बाग, खेळ खल्लास’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात दिल्लीमध्ये आज जामिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटी ते राजघाटपर्यंत मोर्चा (रॅली) काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान फायरिंगचा (गोळीबार) प्रकार घडला आहे. जामिया मिलियाचा आवारात ही गोळी झाडण्यात आली. ज्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.

दिल्लीत जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याची ओळख झाली आहे. गुरुवारी गोळीबार करणाऱ्या या तरुणाचे नाव गोपाळ आहे आणि ग्रेटर नोएडाचा रहिवासी आहे. हा व्यक्ती स्वत:ला फेसबूक प्रोफाइलवर रामभक्त गोपाळ असे म्हणवतो.

gopal

गोळीबारापूर्वी फेसबुक लाइव्ह –
गोळीबार करणारा गोपाळ जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी नाही. गोळीबारापूर्वी गोपाळने जामियातून अनेकदा फेसबूकवरुन लाइव्ह केले होते. यापूर्वी त्यांने एक पोस्ट लिहिली होती की, ‘शाहीन बाग, आता खेळ संपला’. ‘कोणताही हिंदू मीडिया येथे नाही’. सध्या गोपाळ पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे.

दुपारी जवळपास 1 वाजेच्या दरम्यान त्याने ही पोस्ट केली होती. त्यात तो लिहितो की माझ्या अंतिम यात्रेला मला भगव्यामध्ये घेऊन जा आणि जय श्रीरामचे नारे लावा. असे सांगण्यात येत आहे की गोळीबार करणाऱ्या गोपळचे वडील पानाचे दुकान चालवतात.

या प्रकरणी डीसीपी चिन्मय बिस्वाल म्हणाले की प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून कोणतीही चूक झालेली नाही. डीसीपी म्हणाले की त्यांना गर्दीला पुढे जाण्यापासून रोखायचे होते. सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे की हा तरुण कोण आहे आणि कुठून आला होता? सीएए आणि एनआरसीच्या मुद्यांवर जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी विरोध प्रदर्शन करत होते.