जम्मू काश्मीरचे विभाजन ! लडाख होणार ‘केंद्रशासित’ प्रदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करायचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडले असून त्यात जम्मू काश्मीरचा राज्याच्या दर्जा काढून त्यापासून लडाख हे वेगळे केंद्रशासित प्रदेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचवेळी जम्मू काश्मीर हे राज्य न राहता केंद्रशासित प्रदेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अमित शाहांनी या विधेयकावर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले असले तरी विरोधकांनी मोठा गदारोळ केला आहे. ‘कलम 370’ यातील काही वादग्रस्त तरतुदींवर चर्चा करण्यास मी तयार आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांशी मी चर्चा करून उत्तर देण्याची माझी तयारी आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले आहे. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या विधेयकावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेसाठी चार तासांची वेळ निश्चित केली आहे. सध्या त्यावर राज्यसभेत चर्चा सुरु झाली आहे.

या विधेयकामुळे आता जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा राहणार नाही. लडाख हे केंद्र शासित प्रदेश राहणार आहे. जम्मू काश्मीरला विशेष केंद्र शासित प्रदेश असणार असून त्याला विधानसभा राहणार आहे.
भाजपाने गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू आणि लडाख वेगळे राज्य करण्याची मागणी केली होती. भाजपाच्या भूमिकेनुसार हा बदल करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यावर मेहबुबा मुक्तीने लोकशाहीतील सर्वात मोठा काळा दिवस असे या निर्णयाचे वर्णन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –