नागरिकांची सुटका करण्यासाठी ‘शहीद’ झाले मेजर, कर्नल, पोलीस अधिकार्‍यासह 3 जवान

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नागरिकांची सुटका करण्यासाठी लष्कराच्या पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये हंदवाडा परिसरात भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये मेजर, कर्नल, पोलीस अधिकार्‍यासह तीन जवान शहीद झाले आहेत. हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी जीवाची बाजी लावत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

हंदवाडामधील चांजमुल्ला परिसरातील एका घरात दहशतवाद्यांनी नागरिकांना बंदी बनवले होते. याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी टीम रवाना झाली. त्यामध्ये 21 राष्ट्रीय राइफल्स यूनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, इतर जवानांचे पथक होते. त्यांनी घराला घेरुन कर्नल आणि मेजर यांनी घरात प्रवेश केला.

हशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्याला प्रत्युत्तर देत घरात बंदी बनवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात जवानांन यश आले. मात्रा, नागरिकांची सुटका करताना मेजर सूद आणि कर्नल शर्मा यांना वीरमरण आले. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान पोलीस अधिकारी आणि तीन जवानही शहीद झाले आहेत. या रेस्क्यू ऑपरेशनमदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.