काश्मीरमध्ये ‘तणाव’ निर्माण करणार्‍या ११२ अलगाववादी नेत्यांची २२० मुलं विदेशात ‘सेटल’, वाचा ‘टॉप’ नेत्यांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता येथील युवकांना भडकवत आहे. हेच फुटरतावादी नेता आहेत ज्यांच्यामुळे जम्मू काश्मीर मधील युवक विरोध प्रदर्शन करत रस्त्यावर उतरतात आणि देश विरोधी घोषणाबाजी करतात. परंतू तरुणांना फुस लावणारे हे फुटीरतावादी आता उघडे पडले आहेत, कारण गृह मंत्रालयाने या फुटरतावाद्यांची यादी जाहीर केली आहे ज्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. या यादीत आसिया अंद्राबी पासून मीरवाइज उमर फारुक यांचा समावेश आहे.

१. निसार हुसैन (वहीदत ए इस्लामी) – मुलगा आणि मुलगी इराणमध्ये राहतात. मुलगी इराणमध्ये नोकरी करते.
२. बिलाल सेन – सर्वात लहान मुलगी ऑस्टेलियात शिक्षण घेत आहे.

३. अशरफ सहरई (चेअरमन, तहरिक – ए – हुर्रियत) – दोन्ही मुले (खालिद – आबिद) सौदी अरबमध्ये काम करत आहेत.

४. जीएम. भट्ट (आमिर ए जमात) – मुलगा सौदी अरबमध्ये डॉक्टर आहे.

५. आसिया अंद्राबी ( दुख्तरान ए मिल्लत) – दोन्ही मुले परदेशात आहेत. एक मलेशियात शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे.

६. मोहम्मद शफी रेशी (DPM) – मुलगा अमेरिकेत पीएचडी करत आहे.

७. अशरफ लाया ( तहरीक ए हुर्रियत) – मुलगा पाकिस्तानात मेडिकलचे शिक्षण घेत आहे.

८. जहूर गिलानी ( तहरीक ए हुर्रियत) (सैय्यद अली शाह यांचा जावई) – मुलगा सौदी अरब मध्ये एअरलाइंसमध्ये कामाला आहे.

९. मीरवाइज उमर फारुक (हुर्रियतचे चेअरमन) – बहीण अमेरिकेत राहत आहे.

१०. मोहम्मद युसूफ मीर (मुस्लिम लीग) – मुलगी पाकिस्तानच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

या यादीत त्या फुटीरतावादी नेत्यांची नावे आहेत जे काश्मीरच्या नावावर खोऱ्यात हिंसेला खतपाणी घालत आहेत. तेथील तरुणांना भारताविरोधात भडकवण्याचे काम करत आहेत. तसेच देश विरोधी कारवाया करण्यास भाग पाडत आहेत. हेच नेते अनेकदा काश्मीर बंदचा नारा देतात.

असे असले तरी सध्या यातील कोणताच नेता नजर कैदेत आणि ताब्यात आहेत. तर अनेक नेत्यांना देण्यात आलेली सरकारी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्या आहेत. नुकतेच गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की मोदी सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा