जनता दल ते भाजप संगीता खोत यांचा राजकीय प्रवास

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली येथील महापौर पदी पहिल्यांदाच भाजपला संधी मिळाली आहे. महापौर पदी निवड झालेल्या संगीता खोत यांचा विविध पक्षातून राजकीय प्रवास झाला आहे. आता चौथ्या टप्प्यात संगीता खोत यांना नगरसेवक पदाबरोबरच भाजपकडून महापौर पदाची संधी मिळाली आहे. महापालिकेच्या त्या १६ व्या महापौर बनल्या आहेत.
[amazon_link asins=’B01GHSSWDA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94f61cc5-a486-11e8-9aee-fdaa21f5c4be’]

संगीता खोत यांचा महापौर पदापर्यंतचा राजकीय प्रवास

संगीता खोत ह्या जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल यांच्या पत्नी आहेत . २००३ साली पहिल्यांदा जनता दलातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २००८ मध्ये काँग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय विकास महाआघाडी करण्यात आली होती. यामध्ये जनता दलाचाही सहभाग होता. त्यानुसार कुपवाडमधून त्या महाआघाडीतून निवडून आल्या. त्या काळात त्यांनी प्रभाग समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सदस्य म्हणूनही काम केले. त्यानंतर २०१३ साली पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात माजी आमदार संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी निर्माण केली. यामध्ये खोत या स्वाभिमानी आघाडीतून निवडून आल्या. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने प्रभाग समिती सभापती, स्थायी समिती सदस्या, म्हणून काम केले.

मात्र या महापालिका निवडणुकीपूर्वी खोत यांनी मिरजेतील आजी-माजी १५ हून अधिक नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मिरजेच्या प्रभाग ७ मधून ओबीसी महिला गटातून निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांनी धोंडुबाई कलगुटगी यांचा पराभव केला.

दरम्यान, भाजपतर्फे पहिली संधी कोणाला याबाबत कुतूहल होते. महिला ओबीसी प्रवर्गातील संगीता खोत यांच्यासह सविता मदने, अनारकली कुरणे, गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर आदी आठजण इच्छुक होत्या. एकूण आठ जणी इच्छुक होत्या. त्यात मदने, खोत यांच्यासह अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर यांच्या नावाची चर्चा होती. स्थानिक भाजप नेत्याच्या कोअर समितीमध्ये याबाबत चर्चा झाली होती. या समितीने अंतिम निर्णय पालकमंत्र्यांकडे सोपवला होता. काल आमराई क्‍लबमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा होऊन आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. ज्येष्ठत्वाच्या निकषातून भाजपकडून संगीता खोत यांच्या नावावर महापौर पदाची मोहोर लागली.
[amazon_link asins=’B072XTXF8S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d893dea-a486-11e8-8fd1-f1c836dbff81′]

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपने विरोधकांचे शेवटचे सत्ताकेंद्र काबिज केले. यामध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून खोत यांचाही सहभाग आहे. त्यानुसार महापालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचा महापौर होत आहे. त्यामध्ये पहिल्याच महापौरपदाची संधी खोत यांना मिळाली.