Janhvi Kapoor | पापाराझींमुळे जान्हवी कपूरवर आली होती गाडीच्या डिक्कीमध्ये लपून बसण्याची वेळ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवी ही सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असते. ती आता पापाराझींनाही सहजतेने सामोरी जाते. पण पूर्वी असे नव्हते. ती (Janhvi Kapoor) पापाराझींमुळे अगदी गाडीच्या डिक्कीमध्ये लपून बसण्याची वेळ आली होती.

अभिनेत्री जान्हवी कपूर हि अनेकदा इंव्हेटमध्ये व इतर ठिकाणी पापाराझींनी घेरलेली दिसून येते. जान्हवीचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्यांना देखील जान्हवीच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. (Janhvi Kapoor Photo) त्यामुळे पापाराझी नेहमी जान्हवीच्या मागे मागे असतात. आता जरी ती कॉन्फिडेंसने पापाराझी व कॅमेऱ्याला फेस करत असली तरी पूर्वी तिला अनेकदा पापाराझींसमोर येण्यास नकोसे वाटायचे. एका मुलाखती दरम्यान जान्हवीने तिचे हे अनुभव शेअर केले. (Janhvi Kapoor With Paparazzi) जीममधून ती एकदा येत असताना पापाराझींना टाळण्यासाठी तिने तिची गाडी पुढे पाठवून दिली ज्यामुळे फोटोग्राफर्सला वाटेल की ती निघून गेली आणि मागून ती मित्रासोबत येणार होती. मात्र तरी पापाराझींनी तिला गाठण्यासाठी तिचा पाठलाग केला.

एका चॅट शो मध्ये अभिनेत्री जान्हवीने सांगितले की, पापाराझींना हे कसे कळले ते माहित नाही आणि ते पापाराझी त्यांच्या बाईकवरून माझ्या मित्राच्या गाडीच्या मागे लागले. एवढेच नाही तर जान्हवीने सांगितले की, ती कारच्या डिक्कीमध्ये लपली होती. तिच्या डिक्कीत नेहमी एक चादर असते. जेणेकरून ती लपून कुठेही जाऊ शकेल. पण आता जान्हवीने पापाराझींना हाताळण्याची युक्ती शिकल्याचे दिसून येत आहे. ती कुठेही गेली तरी त्यांना खूप छान फेस करते व हसून फोटो देताना दिसते.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) लवकरच अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) सोबत ‘बवाल’ चित्रपटात
(Bawaal Movie) झळकणार आहे. हा चित्रपट येत्या 21 जुलैला ओटीटीवर रिलिज होणार आहे. तसेच जान्हवी ‘जन गन मन’
(Jana Gana Mana Movie) या चित्रपटात देखील भूमिका साकारणार आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर आता दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील धमाकेदार एन्ट्री करणार आहे.
तिच्याकडे अनेक बिग बजेट दाक्षिणात्य सिनेमे आहेत. ती ‘देवारा’ (Devara) या बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची
भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title :  Janhvi Kapoor | janhvi kapoor reveals she was hide in the trunk of the car because of paparazzi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा