Maharashtra Politics News | ‘भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट!’ अमोल मीटकरींचे खोचक ट्विट, गोगावलेंच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले ‘ रायगडच्या मातीचे महत्व… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटातील (Shinde Group) अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले (Mahad MLA Bharat Gogawale) हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मंत्रिपद मिळणार असल्याची चाहूल लागल्यापासून भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री (Raigad Guardian Minister) होण्याच्या महत्त्वाकांक्षेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. (Maharashtra Politics News) मात्र याच दरम्यान गोगावले यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. गोगावलेंच्या विधानावर आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी टीका केली असताना आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी खोचक ट्विट करत गोगावलेंवर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले भरत गोगावले?

शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा करताना म्हणाले, पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) चांगलं काम करु. महिला आणि पुरुष थोडा तर फरक येतो ना. त्याच्यामध्ये मला आमदारकीचा 15 वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सहाच्या सहा आमदार आम्ही सगळेजण एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री, भरतशेठ, असे गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. (Maharashtra Politics News)

 

 

 

भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट !

भरत गोगावले यांच्या विधानावर अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट केलं आहे. भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट! पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु, असं ट्विट मिटकरी यांनी केलं आहे.

 

 

हा अदिती तटकरेंचा अपमान नाही तर… – रोहित पवार

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ ना.
आदितीताई तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील 6 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या
कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!
मा. पवार साहेबांनी (Sharad Pawar) महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना
विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान संधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो,
पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

 

Web Title : Maharashtra Politics News | ajit pawar faction mla amol mitkari mocks Bharat Gogawale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा