‘हे’ 3 खेळाडू टीम इंडियामध्ये कमबॅक करणार, BCCI चं मोठं पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने असे संकते दिले आहेत की, प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ यांचे टीम इंडियात लवकरच पुनरागमन होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. डोप टेस्ट मध्ये दोषी आढळल्यानं पृथ्वी शॉला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. बुमराह देखील 8 ऑगस्टपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. सध्या तो तंदुरुस्तीसाठी मेहनत घेताना दिसत आहे. आगामी न्युझिलंड दौऱ्यातून बुमराह टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. याच दौऱ्यासाठी तंदुरुस्ती चाचणीसाठी बीसीसीआयनं दोघांना बोलावलं आहे.

तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणारा बुमराह भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात तो नेट बॉलर म्हणून मैदानावर उतरणार आहे. 20 वर्षीय पृथ्वी शॉनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. याशिवाय पृथ्वीनं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचं हे पहिलंच द्विशतक ठरलं आहे. 179 चेंडूमध्ये त्यानं 202 धावा केल्या होत्या.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “दुखापतीपासून सावरत असलेल्या खेळाडूंना बोलावून त्यांच्या तंदुरुस्तीसाठीची चाचणी घेण्याचं काम बीसीसीआय नेहमीच करतं आणि हा त्याचाच भाग आहे. बीसीसीआयचे फिजिओ आणि ट्रेनर त्यांची चाचणी घेतील आणि तपासणी करतील.”

वेस्ट इंडिज मालिका झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशीच श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्युझिलंड दौऱ्यासाठी जाईल. तिथे 5 ट्वेंटी-20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like