जया बच्चन यांनी ‘नात’ नव्याच्या कथित बॉयफ्रेंडची घेतली ‘गळाभेट’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संदीप खोसला आणि अबू जानी यांनी गुरुवारी रात्री इंडस्ट्रीत 33 वर्षे पूर्ण केल्यानंतर सेलिब्रेशन केले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आले होते. यात बच्चन परिवार, कपूर खानदान, तसेच करण जोहर सहित अनेक मोठे स्टार्स आले होते. यावेळी जया बच्चन यांनी आपल्या नातीचा कथित बॉयफ्रेंड मीजानची गळाभेट घेतली. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अनेक दिवसांपासून चर्चा आहे की, बिग बी अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा जावेद जाफरीचा मुलगा मीजानला डेट करत आहे. या इव्हेंटची शो स्टॉपर दीपिका पादुकोण होती. दीपिकाच्या मागे मीजान उभा होता. दीपिकाचा अपिरंस संपताच जया पळत गेल्या आणि मीजानची प्रेमाने गळाभेट घेतली. मीजाननेही आनंदांने त्यांना हग केलं.

या इव्हेंटची ओपनिंग मीजानने केली होती. डिझायनर ब्लॅक सूटमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. मीजान आणि नव्या अनेकदा एकत्र स्पॉट होतात. यावर बोलाना मीजान म्हणाला होता की, “आम्ही एकाच फ्रेंड सर्कलमधून आहोत आणि ती माझ्या बेस्ट फ्रेंडची फ्रेंड आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही.”

मीजानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, संजय लीला भन्साळी यांच्या मलाल या सिनेमातून त्याने करिअरला सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्याला आवाजवरूनही लोकांनी ट्रोल केले आहे. मीजानचा रोल पाहिल्यानंतर काहींनी असेही म्हटले की, तो संजय दत्तला कॉपी करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like