Jayant Patil | राज्यात उद्योजकांवर संकट, फॉक्सकॉन प्रकल्प राज्याच्या बाहेर घालवून यांनी वैचारिक दिवाळखोरी जाहीर केली; जयंत पाटलांचा सरकारवर जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे युती सरकार आल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना आणि कामांना स्थगिती दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर होत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भूमिका मांडली आहे. सरकारने नेहमी पुढे पाहून चालायला हवे. मागे पाहून चालू नये, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

 

मागच्या दीड-दोन वर्षात वेगवेगळ्या ग्रामपंचायती, महापालिका यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांना देण्यात आलेला निधी जर का या सरकारने थांबविला, तर त्या गावांची आणि शहरांची प्रगती थांबणार आहे. त्यामुळे या सरकारने मागे काय घडले आणि मागच्यांनी काय केले, हे पाहत न बसता पुढे बघून राज्य चालवावे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

मागच्या कामांच्या खोलांत जाऊन चौकश्या करत बसणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
तो या सरकारने न करता पुढे काय करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सरकार देत असलेल्या स्थगित्या कोणत्या उद्देशाने दिल्या हे पाहावे लागेल.
या सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) या राज्याच्या बाहेर घालवून आपली वैचारीक दिवाळखोरी जाहीर केली आहे.
गुजरातला गेलेल्या प्रकल्पाला थांबविण्याचे धाडस या सरकारला झाले नाही.
एकही मंत्री अग्रवाल यांनी भेटून हा प्रकल्प परत आणू शकले नाहीत.
आता देखील प्रकल्पांना देण्यात आलेल्या जागांना स्थगिती देण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यात उद्योजकांवर एकप्रकारचे संकट आले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Jayant Patil | Crisis on entrepreneurs in state, Foxconn projects out of state, declares ideological bankruptcy; Jayant Patal strongly criticized the government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shashikant Ghorpade | राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईकांवर लाचलुचपक विभागाची कारवाई, आमदार वैभव नाईक म्हणाले…

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप