Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil-Devendra Fadnavis | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Janyat Patil) आज (शनिवारी) पुण्यात (Pune) आले होते. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे बैठक पार पडली. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी जंयत पाटील यांनी पत्रकारांशी सवांद साधला. (Jayant Patil-Devendra Fadnavis)

 

 

 

 

त्यावेळी बोलताना जंयत पाटील (Janyat Patil) म्हणाले की, ‘नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देशातील आणि मराठी भाषेतील थोर साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज यांबद्दल कायम आदर आहे. पण, फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वाङ्‍मयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. (Jayant Patil-Devendra Fadnavis)

 

 

काय म्हणाले होते फडणवीस?

नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. या विधानावरुन जयंत पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली.

 

Web Title :- Jayant Patil-Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis shows disrespect kusumagraj said NCP leader jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा