Jayant Patil | ‘या’ घटनांचा उल्लेख करत जयंत पाटलांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली (Riots), दगडफेक (Stone Pelting), महिलांवर अत्याचार (Women Abuse) असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस (Maharashtra Police) व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसेच या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी आशा असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.

काय लिहिलंय पत्रात?

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, नुकतीच कोल्हापूर येथे समाजमाध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रावरुन झालेला गोंधळ, जळगाव पाळधी येथील 31 मार्च रोजीचा प्रकार, छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमी मिरवणुकीवर झालेली दगड फेक, मुंबई (मालाड मालवणी) येथे रामनवमी मिरवणूक वेळी झालेला वाद, नगर शेगाव येथे 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) जयंती निमित्त निघालेल्या मुरवणुकीतील वाद, त्र्यंबकेश्वर येथे मंदिरासमोरील संदलवरुन संगमनेर येथील लव्ह जिहाद (Love Jihad) विरुद्ध निघालेल्या मोर्चानंतर समनापूर गावात झालेली दगडफेक या अलीकडील घटना पाहता यामगे विशिष्ट विचारधारेचे लोक कार्यरत असल्याचे लक्षात येत आहे.

यामागे महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय प्रकार काही शक्ती करत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब प्रशासनाला निश्चितच भूषणावह नाही.

त्याचप्रमाणे मुंबई, चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात
(Savitribai Phule Government Hostel) घडलेली विद्यार्थिनीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे,
राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडच्या
काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करुन सामान्य जनतेचे
रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा केवळ चाळीस आमदरांच्या रक्षणासठी हे
सरकार कारभार करत असल्याच्या भावनेला खतपाणी मिळेल. आपण ह्या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने
दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल अशी मला खात्री आहे,
असे पत्रात नमूद केले आहे.

Web Title : Jayant Patil | ncp maharashtra president jayant patil writes letter to cm and dcm over law order situation in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या