Jayant Patil On Ajit pawar | ‘पोलीस तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करत असतील तर तुम्ही काय करता?’ जयंत पाटलांचा अजित पवारांना सवाल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Ajit pawar | मराठा आरक्षणावरुन जालना येथे शांततेच्या मार्गाने चाललेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर हे आंदोलन तीव्र झाले आहे. सध्या राज्याचे राजकारण हे याच आंदोलनावर (Maratha Reservation Protest) फिरत असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हा लाठीचार्ज गृहमंत्रालयाच्या (Maharashtra Home Ministry) आदेशावरुन झाला असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला तर, सत्ताधारी महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत या सर्व आरोपांचे खंडन केले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Jayant Patil On Ajit pawar) यांनी छातीठोकपणे सांगितले आहे की, “हे लाठीचार्ज करण्याचे आदेश जर आम्हा तिघांपैकी कोणी दिले असतील आणि हे सिद्ध करुन दाखवलत तर आम्ही राजकारण सोडून द्यायला तयार आहोत. आहे का हिंमत” असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ठणकावून सांगितले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे.

जळगाव येथील राष्ट्रवादीच्या (NCP) स्वाभिमान सभेमध्ये (Swabhiman Sabha) राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत. जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते की होऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, आम्हा तिघांपैकी कोणी आदेश दिले असतील ना तर ते सिद्ध करा. आम्ही राजकारणातून बाजूला होऊ. त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी हात वर करून बोट उंचावत “एस” म्हणत अजित पवारांना समर्थन दिलं.” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री (Maharashtra CM), गृहमंत्री (Maharashtra Home Minister) आणि उपमुख्यमंत्री असताना देखील पोलीस तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करत असतील तर तुम्ही काय करता?” असा खडा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. (Jayant Patil On Ajit pawar)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, “राज्यात तुमचं सरकार, तुम्हाला न विचारता
पोलिसांकडून लाठीचार्ज होत असेल, तर सरकारमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार आहे का, असा सवाल जयंत पाटील
यांनी विचारला, तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करत असतील, तर मग तुम्ही काय करता. पोलीस तुम्हाला न विचारता शांततेत चाललेल्या आंदोलकांना मारहाण करत असतील तर सरकार म्हणून तुम्ही काय करता?” असे जयंत पाटील यांनी विचारले आहे. तसेच, तुमचं हे चॅलेज म्हणजे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही न पटणार आहे, अशा शब्दामध्ये जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या आव्हानाला उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह जळगावमध्ये स्वाभिमान सभा पार पडली.
यावेळी आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या
लाठीचार्जनंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी अजित पवार
यांना एखादा तरी जीआर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काढून दाखवावा असा टोला अजित पवारांना लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती