Jayant Patil On Maharashtra Govt | ‘शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही…’; जयंत पाटलांचा महायुतीवर सरकारवर घणाघात

पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्या आकमक पवित्रा घेतला असून राज्यातील अनेक समस्यांवरुन ते सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. सध्या जयंत पाटील यांचे शेतकरी आत्महत्येवर करण्यात आलेले ट्वीट हे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे (Jayant Patil On Maharashtra Govt). सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही अशा कडक शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी ट्वीट करत शिंदे, फडणवीस, पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येसारख्या (Farmers suicide In Maharashtra) महत्त्वाच्या विषयावर त्यांनी भाष्य केले आहे. (Jayant Patil On Maharashtra Govt)

जयंत पाटील यांनी ट्वीटर हॅन्डलवरुन एका बातमीच्या आधारे वाढत्या शेतकरी आत्महत्येमुळे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 865 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी 2 ते 3 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे.”

पुढे जयंत पाटलांनी लिहिले आहे की, “कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही.” अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला शेतकरी आत्महत्येबद्दल जाब विचारला आहे.
आपल्या राज्यामध्ये कमी पाऊस आणि त्यामुळे होणारे शेतीचे अमाप नुकसान आणि कर्ज यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे.
तसेच या वर्षी राज्यामध्ये सरासरी देखील पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कमी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून
यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. (Jayant Patil On Maharashtra Govt)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

G20 Bharat Mandapam | ‘पोकळ विकासाची पोलखोल…’; पावसामुळं ‘भारत मंडपम’मध्ये भरलं पाणी, कॉंग्रेसचा निशाणा (Video)