Jayant Patil On Nawab Malik | नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Nawab Malik | राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार (NCP Ajit Pawar Group) यांनी बंड केल्यानंतर उभी फूट पडली आहे. राज्यभरामध्ये अगदी पहिल्या फळीपासून ते कार्यकर्त्यांपर्यत अजित पवार गट आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) अशी विभागणी झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आज सकाळपासून माजी मंत्री नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तुरुंगामधून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी स्पष्टपणे ते कोणत्या गटामध्ये सामील होणार आहेत याबद्दल वक्तव्य केलेले नाही. सध्या ते अजित पवार गटामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Jayant Patil On Nawab Malik)

जयंत पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्वत्र नवाब मलिक हे अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्यावर चर्चेवर प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांनी सांगितले की, “नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते कोणाच्या गटात आहेत, याचे त्यांनी कुठे भाष्य केलेले नाही. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जाणार असल्याचं मला मीडियामधूनच समजत आहे.” अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. (Jayant Patil On Nawab Malik)

राष्ट्रवादीमध्ये चालू असलेल्या घडामोडींवर देखील त्यांनी भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत शरद पवार
यांची बाजू मजबूत आहे. यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली आहेत, त्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.” असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

“शरद पवारांच्या नेतृत्वामुळेच आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे.
त्यांना सोडून गेलेले मागील 17 ते 18 वर्षे मंत्रिपदावर राहिलेले आहेत.
त्यावेळी शरद पवारांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही.
आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार केला आहे
तो भारतातील जनता कदापि मान्य करणार नाही.” अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी बंडखोर नेत्यांना टोला लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश