Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंची विचारसरणी नथुराम गोडसेंची; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा (MNS Uttar Sabha) झाली.
या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्याचा संपूर्ण देशाला त्रास होत आहे. येत्या ३ मे ला ईद (Eid) आहे.
तोपर्यंत राज्य सरकारने (Maharashtra State Government) मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, जर तसे झाले नाही तर ज्या मशिदींसमोर भोंगे आहेत तेथे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावूच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयवाद बोकाळला असल्याचे सांगत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
इतकच नाही तर भाषणात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा उल्लेख जंत पाटील आणि चकितचंदू असा केला.
त्यावर आता जयंत पाटील यांनी ट्विटरवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. (Jayant Patil On Raj Thackeray)

 

जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचा अप्रत्यक्षपणे व्हायरस (Virus) असा उल्लेख करत टोला लगावला आहे.
२०१४ ला मोदींना पाठिंबा, २०१९ ला मोदींना विरोध आता मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची (Nathuram Godse) असेही ते म्हणाले.
आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील पुढे म्हणतात की, पुतण्या माननिय बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी.
अखेरच्या ओळीत जयंत पाटील यांनी वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात (Maharashtra) वाढत आहेत असे म्हंटले आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भूमिका आवडली तर उघडपणे बोलतो, असे सांगितले होते.
चुकीचे वाटले तर पुन्हा बोलेन असेही ते म्हणाले होते. त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित पवार (Ajit Pawar),
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि जयंत पाटील (Jayant Patil)
यांच्यावर सडकून टीका केली होती.

 

Web Title :- Jayant Patil On Raj Thackeray | jayant patil answers mns chief raj thackeray criticism from uttar sabha in thane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा