Jayant Patil On Sambhaji Bhide | ‘संभाजी भिडेंना जरांगे यांच्याकडे फडणवीसांनी पाठवले असेल तर…’, जयंत पाटलांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Sambhaji Bhide | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची संभाजी भिडे यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत, तर अजित पवार काळीज असलेला माणूस आहे. त्यामुळे कृपया तुमचं उपोषण थांबवा, असे आवाहन भिडे यांनी जरांगे पाटील यांना केले. (Jayant Patil On Sambhaji Bhide)

संभाजी भिडे यांच्या भेटीवर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वीची त्यांची विधानं फडणवीस यांच्या वाट्याला जातील. जयंत पाटील मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Jayant Patil On Sambhaji Bhide)

जयंत पाटील पुढे म्हणाले, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेली विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत. सर्व माध्यमांचं लक्ष केंद्रीत असतं, तिथे जाऊन भिडेंनी आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने तिथे ते गेले नसतील, ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वीची त्यांची विधानं फडणवीसांच्या वाट्याला जातील. भिडे स्वत:च गेलेत का? याबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण देतील.

काय म्हणाले संभाजी भिडे?

मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही.
फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत
तुमच्यासोबत आहोत. मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या
पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. एक चांगली गोष्ट आहे.
आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करणार नाहीत.
देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
तसेच यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही भाष्य केले.
अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली

Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले