Jayant Patil | ‘नव्या पिढीच्या विचारांशी समन्वय साधायला हवा, तेव्हाच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | राष्ट्रवादी (NCP) परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज (शुक्रवारी) कोकण विभागातील वसई येथून केली. यावेळी त्यांनी वसई-विरार कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ‘आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा’. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास जंयत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

वसई-विरार कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत जंयत पाटील (Jayant Patil) यांच्यासह गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), आमदार सुनील भुसारा (MLA Sunil Bhusara), वसई- विरार शहराध्यक्ष राजाराम मुळीक, निरीक्षक आनंद ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, एलजीबीटी प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील, महिला निरीक्षक सुनिता देशमुख, युवक शहराध्यक्ष योगेश पंधरे, महिला शहराध्यक्ष मेघा म्हात्रे, अश्विनी गुरव, युवती शहराध्यक्ष करिष्मा खामकर, विद्यार्थी शहराध्यक्ष मनिष वर्मा, विद्यार्थी राज्य समन्वयक शुभम जटाळ आदी उपस्थित होते.

त्यावेळी बोलताना जंयत पाटील (Jayant Patil) म्हणाले, आपला पक्ष हा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक विचार आहे.
हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत.
तसेच, मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे,
मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे,
त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा. असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Jayant Patil | we have coordinate thoughts new generation only then will new generation change here ncp leader and minister jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’

Satara Crime | दुर्देवी ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना कारने चिरडले, शिक्षक अनिल दरेकर यांचा जागीच मृत्यू

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नीसोबत झाला वाद, तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ