Satara Crime | दुर्देवी ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांना कारने चिरडले, शिक्षक अनिल दरेकर यांचा जागीच मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मॉर्निंग वॉकला (Morning walk) गेलेल्या दोघांना एका भरधाव कारने चिरडल्याने (Satara Crime) एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर एकजण गंभीर जखमी (injured) झाला आहे. ही घटना सातारा शहरालगत (Satara Crime) असलेल्या मोळाचा ओढा येथे शुक्रवारी (दि.22) सकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेत शिक्षक (Teacher) असलेले अनिल दरेकर Anil Darekar (रा. तामजाईनगर, सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिल दरेकर हे आज सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी ते चालत असताना त्यांना अनोळखी वाहनाने उडवले. यावेळी त्यांच्या पुढे असणाऱ्या दशरथ फरांदे Dasharath Farande (रा. तामजाईनगर, सातारा) यांनाही गाडीची धडक बसली. यामध्ये दरेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर फरांदे हे गंभीर जखमी झाले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तर जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी परिसरात चौकशी करुन वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत (Satara Crime) आहेत.

 

Web Title :- Satara Crime | Unfortunate! Anil Darekar, a teacher, was crushed to death by a car while going for a morning walk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नीसोबत झाला वाद, तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

7th Pay Commission | ‘या’ अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी लागली लॉटरी, पगारात मिळाली 2030 रुपयांची विशेष ‘वाढ’; जाणून घ्या

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जनतेसोबतच्या वागणुकीचे होणार ‘मुल्यमापन’; सर्व कार्यालयात ‘अभिप्राय फॉर्म’ !