Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नीसोबत झाला वाद, तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीलनामा ऑनलाइन –  Pune Crime | एका तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर भयावह पद्धतीने आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) खेड (Khed) तालुक्यात घडली आहे. खेड घाटात संबंधित तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. जयदीप काळूराम जैद (वय, 40) असं आत्महत्या (Suicide) करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उ़डाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जयदीप जैद (Jaideep Jaid) हा खेड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.
घटनेच्या दिवशी त्याचा आपल्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. वाद झाल्यानंतर, जयदीप रागाच्या भरात घराबाहेर पडले होते.
यानंतर खेड घाट परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला (Pune Crime) आहे.
त्यामुळे पत्नीसोबत झालेला वाद जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा एक प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, येथील काही स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, खेड पोलीस घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून (Police) व्यक्त केला आहे.
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | husband commits suicide at khed ghat in pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जनतेसोबतच्या वागणुकीचे होणार ‘मुल्यमापन’; सर्व कार्यालयात ‘अभिप्राय फॉर्म’ !

MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्‍हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार

Ajit Pawar | ‘…तर 100 टक्के क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना परवानगी देणार’ – अजित पवार