भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना १०० कोटीची ऑफर; कुमारस्वामींचा गंभीर आरोप

बंगळुरू : वृत्तसंस्था

कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू कौल दिल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी १०० कोटींची ऑफर देऊ केली असल्याचा गंभीर जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामी म्हणाले की, जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी १०० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. हा काळा पैसा कोठून येत आहे? ते स्वतःला गरिबांचे कैवारी समजतात आणि आज ते आमदार फोडण्यासाठी पैशांची ऑफर देत आहेत. यावेळी त्यांनी आता आयकर खाते कोठे आहे? असाही सवाल उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, की भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी होईल हे विसरून जावे. भाजप सोडून आमच्याकडे येणारी लोकही आहेत. जर भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही तीच पद्धत वापरू आणि त्यांचे दुप्पट आमदार फोडू. मी राज्यपालांना विनंती करतो, की घोडेबाजाराला प्रोत्साहन देईल असा कोणताही निर्णय त्यांनी घेऊ नये.
दरम्यान, आज भाजप, कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या तिन्ही पक्षांनी आमदारांच्या बैठका बोलावल्या आहेत. या बैठकांमध्ये काँग्रेसचे १२ तर जेडीएसचे २ आमदार गैरहजर आहे.

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ
कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान