जेजुरीत रुग्णालये व पोलीस स्टेशनला PPE किटचे वाटप

जेजुरी (संदीप झगडे) : कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी डॉक्टर्स,पोलीस,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी योद्धा म्हणून काम करीत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या व या योध्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरंदर तालुक्यातील ग्रामीण संस्थेच्या राजवर्धिनी जगताप व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वतीने आनंदी हॉस्पिटलच्या माध्यमातून पीपीई किट वाटप सुरु करण्यात असल्याची माहिती आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉ सुमित काकडे यांनी सांगितले .

मंगळवार दि. 28 रोजी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पीपीई किटचे वाटप पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी पूनम शिंदे,जेजुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,नगरसेवक सचिन सोनवणे,महेश दरेकर,गणेश शिंदे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सम्राट दिग्विजय,डॉ सुमित काकडे,डॉ प्रमोद वाघ,रुग्णसमितीचे हरिभाऊ रत्नपारखी उपस्थित होते . पुरंदर तालुक्यातील जेजुरी,सासवड,नीरा,वाल्हे, परींचे, माळशिरस,बेलसर,गराडे येथील रुग्णालये,जेजुरी सासवड पोलीस स्टेशन,जेजुरी सासवड येथील नगरपालिका कर्मचारी ,पुरंदर हवेळीतील सर्व डॉक्टर्स तसेच आशा वर्कर यांना 300 पीपीई किटचे वाटप करण्यात येत आहे .

आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील 16 ठिकाणी नाकेबंदी करून पोलीस,आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या मार्फत ये-जा करणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करणाऱ्याना पीपीई किट देण्यात येणार असल्याचे डॉ सुमित काकडे यांनी सांगितले . फोटो ई-मेल केला आहे ग्रामीण संस्था व आमदार संजय जगताप यांच्या वतीने आनंदी हॉस्पिटलच्या माध्यमातून जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पीपीई किटचे वाटप करताना तहसीलदार रुपाली सरनोबत व इतर .