जेजुरी नगरपरिषदेच्या वाढीव घरपट्टी कर विरोधात नागरिकांचा तीव्र संताप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जेजुरी येथील नगरपरिषेदेच्या जुलमी आणि मनमानी कारभार मुळे जेजुरी नागरिक संतप्त झाले असून वाढीव मालमत्ता, वाढीव घरपट्टी वाढ कर विरोधात जेजुरी येथील बुरुड धर्मशाळा येथील आयोजित पत्रकार परिषदेत आवाज उठवला असून घरपट्टी वाढ न थांबल्यास समस्त कृती समिती आंदोलक गोधड्या हांथरुण पांघरून घेऊन नगरपालिकेत मुक्काम ठोकू असा खणखाणीत इशारा माजी नगरसेवक रमेश गावडे यांनी दिला आहे.

तर जेजुरी नगरपरिषदेचा औरंगजेबाचा जीजीया कर आम्ही सहन करणार नाही अन्यथा पालिकेला धडा शिकविल्या शिवाय शांत राहणार नसल्याचा इशारा देवसंस्थान विश्वस्त आणि संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते संदीप जगताप यांनी दिला. सादर केलेलं सर्वक्षण चुकीचे असून पुनः सर्वेक्षणाची मागणी करत समस्त ग्रामस्थांना घेऊन जेजुरी बंदची हाक देणार असल्याचे पालिकाविरोधी नगरसेवक जयदीप बारभाई यांनी सांगितले. यावेळी नागरिक आणि सर्वपक्षीय सदस्य विठ्ठल सोनवणे, प्रसाद अत्रे, पंडित हरपळे, राजाभाऊ खाडे, हरी बोधले, तुकाराम यादव, राजू कुदळे, प्रशांत लाखे, माणिक पवार, रामदास दळवी, माधव बारभाई, घोषभाई पानसरे, माणिकराव पवार, तुकाराम झगडे आदी उपस्तिथ होते.

तर भाजपच्या अलका शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत वाढीव कर वाढ रद्द न केल्यास जेजुरी नगर परिषदेला चोळी बांगड्याचा आहेर दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे सद्या तरी सदानंदाच्या येळकोट गर्जना करणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीत स्थानिकांना मात्र जुलमी पालिके विरुद्ध आंदोलनाची हाक द्यावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सदर केलेली घरपट्टी कर वाढ रद्द न केल्यास येत्या अकरा तारखेला जेजुरी बंद हाक दिली असून सर्व नागरिक पालिकेत बिऱ्हाड घेऊन मुक्काम ठोकू असा नागरिकांनी इशारा दिला आहे.