अधिकारी कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास जोड्याने हाणा, भाजप आमदार बरळला

ललितपूर : वृत्तसंस्था – भाजप नेते काही ना काही वादग्रस्त विधानं करून चर्चेत येत आहेत. ललितपूर जिल्ह्यात महरौनी कसब्यात आयोजित कार्यक्रमात एका आमदाराने संबोधित करत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधानं केली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना बुटाने मारा अशी मुक्ताफळं या आमदाराने उधळली आहेत.

भाजप आमदार रामरतन कुशवाहा यांनी हे विधान केलं आहे. यावेळी मंचावर श्रम व सेवा योजन राज्यमंत्री मनोहरलाल पंथ आणि नवनिर्वाचित खासदार अनुराग शर्मा उपस्थित होते.

काय म्हणाले कुशवाहा ?
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पार्टीची सदस्यत्व घेण्यासाठी दबाव टाकला. योग्य मतालाही किंमत देत नाहीत. सहन करण्याचाही एक मर्यादा असते. काही अधिकारी सपा, बसपाच्या मानसिकतेचे आहेत. त्यांना सुधारण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा वेळ देतो. ते सुधारले नाही तर त्यांना बुटाने मारा. असा इशारा त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.