‘घुसखोर’ तुमचे चुलत भाऊ लागतात का ? अमित शहांचा राहुल गांधींकडे ‘इशारा’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमध्ये प्रचार सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शहांनी एनआरसीचा विरोध करणाऱ्या राहुल गांधीवर निशाणा साधत सांगितले की राहुल बाबा विचारतात की एनआरसी का आणला जात आहे आणि घुसखोरांना बाहेर का काढण्यात येत आहे. ते कुठं जाणार ? काय घालणार ? आणि काय खाणार ?

अमित शाह म्हणाले की घुसखोर काय राहुल बाबांचे चुलत भाऊ लागतात का ? राहुल बाबांना बोलू द्या, परंतू मी सांगू इच्छितो की 2024 च्या आधी देशातील सर्व घुसखोरांना एक एक करुन देशाच्या बाहेर काढण्याचे काम भाजप करेल.

झारखंडने अनेक सरकारं पाहिली आहेत, परंतू कोणीही विकासाला गती देऊ शकले नाहीत. कारण कोणतही सरकार पूर्ण बहुमताचं नव्हतं. 2014 साली देशाने पीएम मोदींनी पूर्ण बहुमत दिलं आणि झारखंडने रघुवर दास यांना पूर्ण बहुमत दिलं. याचा परिणाम असा झाला की आज झारखंडचा विकास झाला आहे. विकासाच्या मार्गावर झारखंड मार्गक्रमण करत आहे.

आम्ही झारखंडच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे की जसे भाजप सरकार सत्तेत येईल तसे आदिवासांची आणि दलितांचे आरक्षण कमी न करता ओबीसी समाजाचे आरक्षण वाढण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहोत. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वात झारखंड विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

अमित शाह म्हणाले की, बहरागोडा विधानसभेचे प्रत्येक गाव पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जोडले गेले आहे. सखी मंडळांची निर्माण करुन हजारो महिलांना रोजगार देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. इतकी वर्ष अनेक सरकारे आलीत परंतू झारखंडची रचना कोणीही केली नाही, जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आले आणि अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा झारखंडचा विकास झाला.

अमित शहांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की, 7 डिसेंबरला जेव्हा तुम्ही मतदान कराल, तर ते मत एखादा आमदार बनवण्यासाठी, सरकार बनवण्यासाठी किंवा रघुवर दास यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही तर विकासासाठी द्या. भाजपला देण्यात आलेले एक एक मत झारखंडच्या विकासासाठी असेल.

Visit : policenama.com