विधायक ! महिला IAS अधिकार्‍याची सरकारी रूग्णालयात ‘प्रसुती’, दिला ‘गोंडस’ बाळाला जन्म

रांची : वृत्तसंस्था – सरकारी रुग्णालय म्हटलं कि आपण घाबरतो. सरकारी प्रशासन व्यवस्थेबद्दलची अनास्थाही यास कारणीभूत आहे. मध्यमवर्गीय नागरिकही सरकारी रुग्णालयात जाणे टाळतात. सुविधांचा अभाव आणि तेथील कर्मचाऱ्यांचा बडेजावमुळे आपण सरकारी रुग्णालयापासून दूर राहतो. पण प्रसुतीसाठी एका आयएएस अधिकारी महिलेने चक्क सरकारी रुग्णालयाची निवड केली.

आदिवासीबहुल झारखंड राज्यातील गोड्डा येथे सेवा बजावत असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याने आपली प्रसुती चक्क सरकारी रुग्णालयात केली. जिथं नगरपालिकेतील साधा कर्मचारीही पाय ठेवायला नको म्हणतो, तिथं चक्क महापालिकेच्या उपायुक्तांनीच सरकारी रुग्णालयात जाणे पसंत केले, तेही स्वत:च्या प्रसुतीसाठी.

किरण कुमारी यांनी आपली प्रसुती सरकारी रुग्णालयातच करण्याची निर्णय घेतला होता. गोड्डा येथील उपायुक्त किरण कुमारी पासी यांनी सरकारी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. किरण कुमारी यांनी गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ आणि त्याची आई दोन्हींची प्रकृती उत्तम आहे. समाजाला किरण कुमारी यांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. किरण यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच देवधर जिल्ह्याच्या कलेक्टर नैंसी सहाय यांनीही किरण कुमार यांचं कौतुक केलं आहे.