झारखंड निवडणूक : ‘या’ 5 कारणामुळं भाजपाला झटला, फेल झालं मिशन 65

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड विधानसभा निवडणूक भाजपला मोठा झटका मिळणार आहे. निकालावरुन काँग्रेस – झारखंड मुक्ती मोर्चाच्या महागठबंधनाला मोठे समर्थन मिळत आहे. निवडणूकीनंतर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी ‘अबकी बार 65 पार’चा नारा दिला होता, परंतु या निवडणूकीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांना मोठा झटका बसला. भाजप अबकी बार 65 पारचा नारा यशस्वी करु शकले नाही.

याता या निवडणूकीनंतर भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि रघुवर दास यांनी अनेकदा प्रचारात जनतेला डबल इंजिनचे सरकार आणण्याचे आवाहन केले. डबल इंजिनचं सरकार म्हणजे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार. परंतु झारखंडच्या जनतेने मात्र भाजपला स्पष्ट नाकरले. भाजपच्या पराभवाची काय कारणं असू शकतात याची चर्चा आता सुरु झाली आहे.

१) रघुवर दास यांच्यावर जनता नाराज आणि गैर अदिवासी चेहरा
2014 च्या विधानसभा निवडणूक भाजपने 37 जागांवर विजय मिळला होता. रघुवर दास असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाचा संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. परंतु भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकली नाही. 5 वर्षात झारखंडमध्ये अशा काही घटना घडल्या की जनता मुख्यमंत्र्यांवर नाराज झाली. 15 नोव्हेंबर 2018 ला झारखंड स्थापना दिवशी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीचार्ज झाला यात अनेक शिक्षक गंभीर जखमी झाले. तर एका शिक्षकांचा मृत्यू झाला. या विरोधात शिक्षकांनी संप पुकारला, त्यानंतर रघुवर दास यांची राज्यातील प्रतिमा ढसळत गेली. झारखंडमध्ये जवळपास 70 ते 80 हजार शिक्षक आहेत.

याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. विरोधक हेमंत सोरेन यांनी विधानसभेच्या निवडणूकीत प्रचारादरम्यान हे मुद्दे उचलून धरले. सीएनटी या कायद्यात बदल केल्याने रघुवर दास यांची प्रतिमा ढसळली. विरोधकांनी जल, जंगल, जमीनचा मुद्दा उचलून धरला.

२) राष्ट्रीय मुद्द्याऐवजी स्थानिक मुद्द्यावर जोर –
सरकारी नोकरीच्या मुद्द्यामुळे पाच वर्ष झारखंडमध्ये विरोधक सरकारवर टीका करत राहिले. राज्य सरकारी शाळांमध्ये बाहेरील राज्यातील उमेदवारांनी नोकरी मिळाल्याने विरोधक पेटून उठले. झारखंडमध्ये राज्य लोकसेवा आयोगाची एक देखील परिक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे रघुवर सरकारवर लोक नाराज होते.

३) AJSU आणि भाजपात ऐनवेळी फूट
भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट युनियन मागील 5 वर्ष सत्तेत होते. परंतु आता निवडणूक लढण्याच्या वेळी मात्र दोघे वेगळे झाले. आजसू भाजप बरोबर होती तेव्हा 2014 च्या निवडणूकीत 8 विधानसभा जागांपैकी 5 जागावर विजय मिळवला. परंतु आता आजसू 52 जागांवर लढली. त्यामुळे भाजपची मते आजसूच्या उमेदवारांकडे वळाली. एवढेच नाही तर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने झारखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढली.

४) सरयू राय बंडाने चुकीचा संदेश –
सरयू राय यांनी ओळख घनिष्ठ नेता म्हणून होती, सरयू राय यांनी बिहार आणि झारखंडच्या काही घोटाळ्याचा पर्दाफाश केला. चारा घोटाळ्यात सरयू यांनी मोठी भूमिका बजावली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना तुरुंगात पाठवण्यात सरयू राय यांनी मोठी भूमिका निभावली. परंतु सध्या रघुवर दास आणि सरयू याचे संबंध ताणले गेले आहेत. सरयू राय जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत. परंतु जेव्हा सरयू राय यांना तिकिट मिळाले नाही तेव्हा त्यांनी रघुवर दास यांच्या विरोधात गेल्याने भाजपात संदेश गेला की भाजपने एका अशा नेत्याला तिकिट दिले नाही ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहिम राबवली.

५) भाजपमध्ये अंतर्गत राजकारणाचा फटका
या निवडणूकीत भाजपला असहयोग आणि अंतर्गत राजकारणाचा मोठा झटका बसला. निवडणूकीआधी दुसऱ्या पक्षातील आमदार भाजपमध्ये गेले. भाजपने या आयात नेत्यांना तिकिट दिल्याने भाजपचे बंडखोर आमदार अपक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरले. 15 डिसेंबरला भाजपच्या बंडखोर नेत्यांवर कारवाई केली गेली आणि 11 नेत्यांना 6 वर्षासाठी पक्षातून बाहेर काढण्यात आले.

भाजपमधून काढण्यात आलेल्या नेत्यांनी अधिकृत उमेदवांराच्या विरोधात निवडणूक लढली. ज्या नेत्यांच्या विरोधात भाजपने कारवाई केले त्यात प्रवीण प्रभाकर, जामताडाहून तरुण गुप्ता, जरमुंडीहून सीताराम पाठक, नाला हून माधव चंद्र महतो, बोरियोहून माजी अध्यक्ष ताला मरांडी, राजमहलहून नित्यानंद गुप्ता, बरहेटहून ग्रेम्ब्रिएम हेम्ब्रम आणि लिली हांसदा, शिकारीपाडाहून श्याम मरांडी, दुमकाहून शिव धन मुर्मू आणि जरमुंडीहून संजयनन्द झा या नेत्यांनी विधानसभेत भाजपचे मोठे नुकसान केले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/