Jiddari Marathi Movie | उत्कट प्रेमकथा असलेला ‘जिद्दारी’ शिवजयंती च्या पूर्वसंध्येला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

'जिद्दारी' मध्ये दिसणार प्रेमकथा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महीला सबलीकरण असा त्रिवेणी संगम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Jiddari Marathi Movie | शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेती पिकली, शेतकरी जगाला तरच जगरहाट सुरू राहणार हे वास्तव आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण आणि एक उत्कट प्रेमकथा यांचा त्रिवेणी संगम असलेला जिद्दारी’ हा मराठी चित्रपट (Jiddari Marathi Movie) येत्या ‘शिवजयंती’च्या (shivjayanti 2022) पूर्वसंध्येला म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमोल आबासाहेब शिंदे होळकर (Amol Abasaheb Shinde Hoalkar) म्हणाले, ‘जिद्दारी’ म्हणजे जिद्द. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत असला तरी त्यामध्ये महिला सबलीकरण आणि एक सुंदर अशी प्रेमकथा सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विदुला बाविस्कर (Vidula Baviskar), शुभम तारे (Shubham Tare), विजय अंजान (Vijayraj Anjan), रवींद्र सोळंके (Ravindra Solnke), रवींद्र ढगे (Ravindra Dhage), सुधीर माले (Sudhir Male), राजश्री पठारे ( Rajshree Pathare), जयश्री सोनवणे (Jayashree Sonawane) यांच्या भूमिका आहेत.

ए. आर. माइंडस प्रॉडक्शन (A. R. Minds Production) प्रस्तुत ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती दीप्ती जाधव शेंदारकर ( Deepti Jadhav Shendarkar) यांची आहे. संगीत दिग्दर्शक देव – सुचिर यांनी सुहास मुंडे, निखिल राजवर्धन यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे तर ‘जिद्दारी’ मधील गीते आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, सोनिया उपाध्याय, अतुल जोशी, राजलक्ष्मी शेंदारकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत. (Jiddari Marathi Movie )

‘जिद्दारी’च्या निर्मात्या दीप्ती जाधव शेंदारकर म्हणाल्या, आमचा चित्रपट महिला, शेतकरी यांचे एक वेगळे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये मराठवाड्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अभिजीत कांबळे आहेत, संकलन अमोल निंबाळकर, पूजा पाटील यांनी केले आहे, तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी ज्ञानेश अ. शिंदे, सूरज स. शिंदे यांनी सांभाळली आहे.

‘जिद्दारी’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Web Title : Jiddari Marathi Movie | Jiddari with a passionate love story is coming to the audience on the eve of shivjayanti 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’