एअरटेलचा नवीन स्मार्ट ‘सेट-टॉप’ बॉक्स, Jio ला टक्कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओ ने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना चांगलाच धक्का दिला होता. ग्राहकांना अतिशय स्वस्त टेरिफ योजना पुरवून इतर कंपन्यांचे मार्केटमध्ये तग धरणे अवघड करून टाकले होते. जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असतानाही आपले दर कमी करावे लागेल होते. त्या धक्यातून कंपन्या आजही सावरण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा एकदा रिलायन्सने जिओ गिगा फायबर सादर करत या कंपन्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. जियो गिगाफायबर मध्ये ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट सोबत काही आकर्षक सुविधा तसेच ऍडव्हान्स ४-के सेट-टॉप-बॉक्स मिळणार आहे. जिओ गिगा फायबरला टक्कर देण्याची तयारी भारती एअरटेल करत आहे.

एअरटेल सेट टॉप बॉक्सचे उद्या होऊ शकते अनावरण
दिल्ली मध्ये उद्या (२ सप्टेंबर ) रोजी भारती एअरटेलने एका प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करणार आहे. त्यादरम्यान कंपनी आपल्या स्मार्ट-सेट-टॉप बॉक्सची घोषणा करू शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, एअरटेल जिओच्या सेट-टॉप-बॉक्स पेक्षा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईल. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एअरटेल ग्राहकांना डिजिटल एंटरटेनमेंट आणि हाई-स्पीड ब्रॉडबँड स्पीड अँड्रॉइड आधारित सेट-टॉप-बॉक्सचे अनावरण करेल. यामध्ये इंटिग्रेटेड टॅरिफ पॅक सुद्धा असू शकतो.

सेट-टॉप-बॉक्स सोबत मिळू शकतो एचडी टीव्ही
एअरटेल जिओ ला टक्कर देण्यासाठी सुपर प्रीमियम टेरिफ पॅक सेट-टॉप-बॉक्स ऑफर करू शकतो. असेही ऐकण्यात येत आहे की, एअरटेल पॅक सोबत ग्राहकांना मोफत एचडी एलईडी टीव्ही देऊ शकते. या प्लॅनच्या माध्यमातून एअरटेल जिओच्या वेलकम ऑफरला शह देण्याचा प्रयत्न करू शकते.

देशभर सुविधा सुरु करण्याची तयारी
एअरटेलने चंदिगढ, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश मध्ये एक इंटिग्रेटेड बिलिंग सिस्टीम सुरु केली आहे. तीच योजना पुढच्या महिन्यात सर्व देशभर लागू केली जाणार आहे.

एअरटेलशी संबंधित जुडलेल्या काही सूत्रांनी सांगितले की, कंपनी एंटरमेंट कम ब्रॉडबँड टॅरिफ पॅक ५ सप्टेंबरला जियोफाइबर चे व्यावसायिक लाँच रोलआउट च्या वेळी करू शकते.

इतर दुसऱ्या सुविधाही भेटतील
एअरटेल च्या एंटरटेनमेंट कम ब्रॉडबँड सुविधा निवडण्यासाठी ग्राहकांना प्रीमियम ओटीटी कन्टेन्ट, व्हिडीओ स्ट्रीमिंग एप्लिकेशन, एचडी टेलिव्हिजन वाहिन्या, व्हर्चुअल रिऍलिटी अँप्स पासून इंटरॅक्टिव्ह गेमिंग सुविधा मिळेल. काही निवडक प्लॅनची अंदाजित हाई-स्पीड ब्रॉडबँड स्पीड १०० एमबीपीसी असू शकते. शुल्क निर्धारित करण्याची योजना अशी असेल जी स्पर्धेत टिकू शकेल.

आरोग्यविषयक वृत्त